ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेश सुचना
उद्योजक , मेकर्स , संशोधक आणि चांगला माणूस बनण्यासाठीप्रवेश पात्रता : हाताने काम करण्याची आवड , किमान वय : १५ वर्षे पूर्ण, ग्रामीण भागात राहून शिकण्याची तयारी, खूप उत्साह व धड्पडण्याची वृत्ती
विज्ञान आश्रमाला 2022 – 23 या वर्षासाठी “Diploma in Basic Rural Technology” (Batch 2021-22) DBRT या कोर्स ची प्रवेश प्रक्रिया सुरू करतांना आनंद होत आहे. हा कोर्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपनिंग स्कूल (NIOS) कडून मान्यता प्राप्त आहे. ज्या विद्यार्थ्यांना हाताने काम करून शिकण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे.
शैक्षणिक पात्रता : किमान १० वी – १२ वी , वय : किमान १५ वर्षे
कालावधी : १ वर्षे ( १० जुलै २०२२ – २५ जून २०२३ )
COVID लस चे दोन्ही डोस घेतलेले आवश्यक
कोर्स ची वैशिष्ट्ये :
DBRT हा विविध कौशल्यांनी युक्त असा अभ्यासक्रम असून ह्यामध्ये खालील प्रशिक्षण दिले जाते.
- अभियांत्रिकी : या मध्ये फॅब्रीकेशन आणि बांधकाम आणि सुतारकाम, अभियांत्रिकी आरेखन आणि अकाऊंट इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाईल.
- उर्जा आणि पर्यावरण : या मध्ये इलेक्ट्रिकल, मोटार रिवायंडिंग,सर्वेक्षण पद्धती सौर आणि बायोगॅस इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाईल.
- गृह आणि आरोग्य : या मध्ये शिवणकाम,अन्न प्रक्रिया आणि ग्रामीण लॅब इत्यादीचेप्रशिक्षण दिले जाईल.
- शेती व पशुपालन : या मध्ये शेती, रोप वाटिका, कुक्कुटपालन , शेळी पालन, हरित गृह, माती – पाणी परीक्षण इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाईल.
- संगणक,चिंतन,खेळ,साहस हे सुद्धा ह्या उपक्रमाचाच भाग आहेत.
- डिजिटल फॅब्रीकेशनसाठी फॅबलॅब आणि ३-D प्रिंटिंग हे ऐच्छिक विषयी आहेत.
- “काम करत करत शिका” असे ह्या कोर्सचे तत्वज्ञान आहे.
- अभ्यासाचे माध्यम : मराठी,हिंदी, इंग्रजी.
कोर्सचा कालावधी : १० जुलै २०२२ – २५ जून २०२३
कोर्स फी :
- Tuition Fees: Rs.18,000/- [ यात NIOS चे प्रवेश शुल्क रू.३२५० चा समावेश आहे]
- स्वयंपाक गृह : रु. 24,000 ( रु. 2000 प्रती माह) सकाळी न्याहारी व दुध, दुपारचे जेवण, दुपार चा चहा व रात्री चे जेवण
- वसतिगृह शुल्क : 3000/- ( १ वर्ष )
- होस्टेल मधील गादी व बेडशीट शुल्क : 1000/-
एकूण फी : A + B + C + D = Rs. 46,000/-
प्रवेश अर्ज हा online भरावा किंवा भरून पोस्टाने किंवा समक्ष पाठवावा.
[ गरजू विद्यार्थ्यांसाठी मर्यादित कर्जाऊ शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती परत करावी अशी अपेक्षा आहे ]
Asha for Education व Eaton foundation च्या मदतीमुळे आम्ही कोर्स फी कमी ठेऊ शकत आहोत. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ शकत आहोत.
महत्वाचे :
- शिक्षण पध्दत : प्रत्यक्ष अनुभवातून प्रशिक्षण या पध्दतीने विद्यार्थी शिकतील.
- जे आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करू इच्छितात त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
- होस्टेलची सुविधा उपलब्ध आहे.
- गरजू विद्यार्थ्यांसाठी मर्यादित कर्जाऊ शिष्यवृत्ती उपलब्धआहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती परत करावी अशी अपेक्षा आहे.
- मुलीं साठी विशेष शिष्यवृत्ती आहे.
- विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करणे अपेक्षित आहे. सकाळची प्रार्थना,व्यायाम,ध्यान,इंग्रजीवर्ग इ. उपस्थिती आवश्यक आहे. जे विद्यार्थी शिस्तीचे पालन करणार नाहीत त्यांना दंड केला जाऊ शकतो.
- आश्रमातील विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन वापरण्याची परवानगी नाही. फोन चोरी गेल्यास आश्रमांची जबाबदारी नसेल.
- ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हवी असेल त्यांना सर्व मूळ प्रमाणपत्र जमा करावी लागतील. तसेच दोन व्यक्तींची शिफारस व हमी पत्र जोडावे.
- ज्या विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक गरजा असतील किंवा दिव्यानग विद्यार्थ्यांनी संचालकांशी चर्चा करावी.
- आश्रमात कुठल्याही प्रकारचे व्यसन करण्यास मनाई आहे. आढळल्यास आश्रमातील प्रवेश रद्द होऊ शकतो.
प्रवेश घेण्यासाठी :
- माहितीपत्रक वाचा आणि अभ्यासक्रम समजावून घ्या.शक्य असल्यास पाबळला भेट द्या.
- विद्यार्थ्यांना विज्ञान आश्रमाचा माहितीपट दाखवा.
- विज्ञान आश्रम ऑनलाइन प्रदर्शन :
- English Documentary :
- मराठी माहितीपट :
- डॉ.योगेश कुलकर्णी ची मुलाखत :
माहितीपत्रे
- Please click here for more information on DBRT:
- Information about DBRT
- Brochure in English
- Brochure in Marathi
- Download Application form: माहिती अर्ज
अधिक माहिती साठी :
श्री. विशाल जगताप : 9730005025
श्री. कैलास जाधव : 9730005030
श्री. रणजीत शानबाग : 9579734720
अधिक माहिती किंवा सुचना : योगेश कुलकर्णी : 9730005016
पत्ता : विज्ञान आश्रम , पाबळ जि.पुणे ४१२४०३